डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशातल्या शेतकऱ्यांमध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही, शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते अजमेर जवळच्या पुष्कर इथं १०५ व्या जाट परिषदेला संबोधित करत होते. नव्या पिढीमध्ये नैतिकता रुजवण्याचं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. प्रत्येकानं आपल्या कुटुंबाची आणि पर्यावरणाची काळजी घ्यावी, आपापल्या कर्तव्याचं पालन करावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.