March 30, 2025 8:27 PM

views 30

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

पर्यावरण विषयक जागतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नवोन्मेषाची गरज असल्याचं  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. धनखड यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पर्यावरण विषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधीत केलं. अशा प्रकारच्या सहकार्यामुळेच पर्यावरणीय शाश्वतता आणि आर्थिक विकास साध्य करता येईल असं ते म्हणाले. पर्यावरणीय समस्यांचं निराकरण एकटा व्यक्ती, गट किंवा कोणताही एक देश करू शकत नाही असं ते म्हणाले. नागरिकांना पर्यावरण संवर्धनावर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं...

February 1, 2025 2:54 PM

views 37

उपराष्ट्रपती आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला भेट देणार

उपराष्ट्रपती जगदिप धनखड आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला भेट देतील आणि पवित्र स्नान करतील. देशविदेशातले उच्च अधिकारी महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत. महाकुंभ मेळा हा केवळ भारतातलंच एक अध्यात्मिक संमेलन नाही तर जगातलं सर्वात मोठं सांस्कृतिक संमेलन बनल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

January 5, 2025 8:07 PM

views 36

उपराष्ट्रपतींची राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट

नागरिकाची राष्ट्रवादाशी घट्ट बांधिलकी असल्याशिवाय कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिल्यानंतर बोलत होते.    भारताच्या विकासाकरता नागरिकांचा राष्ट्रवाद आणि संघटन तसंच राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन आवश्यक आहे. देशाचा कायापालट हा  सामाजिक ऐक्य, तळागाळात रुजलेली देशभक्तीची मूल्य, पर्यावरणविषयक जागृती, स्वावलंबन आणि नागरी कर्तव्य या पाच स्तंभांवर आधारित आहे. या पाच स्तंभांची...

December 24, 2024 6:54 PM

views 23

नाताळनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आशा, करुणा आणि एकीचा संदेश देणाऱ्या या सणाच्या दिवशी  सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या अनाम कार्यकर्त्यांचं स्मरण करुया असं उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत राजभवन इथं आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात राज्यपालांनी केक कापून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

December 3, 2024 8:27 PM

views 31

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, तसंच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सर्व शाखांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेच्या शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन, तसंच संस्थेनं विकसित केलेली दोन नवी तंंत्रज्ञानं आणि संस्थेच्या कामाशी संबंधित तीन पुस्तकांचं प्रकाशनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, या खात्याच...

December 1, 2024 12:12 PM

views 19

नागालँड चा आज बासष्ठावा स्थापना दिवस

नागालँड आपला बासष्ठावा स्थापना दिवस आज साजरा करत आहे. 1963 मध्ये या दिवशी नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले. नागालँडच्या इतिहासातील या महत्वपूर्ण मैलाचा टप्पा साजरा करण्यासाठी राज्यभरात आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम राजधानी कोहिमा इथं होणार आहे. मुख्यमंत्री नेईफिऊ रियो याप्रसंगी लोकांना संबोधित करतील आणि गेल्या साठ वर्षातील राज्याच्या वाटचालीचा आढावा घेतील. नागालँडचे राज्यपाल ल. गणेशन यांनी नागालँड राज्य स्थापना दिवसानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दि...

November 14, 2024 8:37 PM

views 27

शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशातल्या शेतकऱ्यांमध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही, शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते अजमेर जवळच्या पुष्कर इथं १०५ व्या जाट परिषदेला संबोधित करत होते. नव्या पिढीमध्ये नैतिकता रुजवण्याचं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. प्रत्येकानं आपल्या कुटुंबाची आणि पर्यावरणाची काळजी घ्यावी, आपापल्या कर्तव्याचं पालन करावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. 

September 16, 2024 9:37 AM

views 41

सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे इतर रोजगारसंधींना गवसणी घाला- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीमध्ये जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल मुंबईत केल. राज्यातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, नागपूर...

September 15, 2024 7:08 PM

views 46

नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उपराष्ट्रतींच्या हस्ते उद्घाटन

  नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उद्घाटन उपराष्ट्रती जगदीप धनखड यांनी केलं. विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्हे, तर तंत्रज्ञानातल्या संधींचा शोध घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक, विज्ञान, आणि अभियांत्रिकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा सामावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लाॅकचेन यांसारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान आव्हानात्मक, मात्र संधी उपलब्ध करून देणारं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सां...

September 14, 2024 8:29 PM

views 32

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातल्या ४३४ आयटीआय संस्थांमधे उभारण्यात आलेल्या संविधान मंदिरांचं उद्घाटन करणार आहेत. उद्या दुपारी उपराष्ट्रपती नागपूर इथं पोहोचतील. नागपूरच्या रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन त्यांच्या सोबत असतील.