डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

पर्यावरण विषयक जागतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नवोन्मेषाची गरज असल्याचं  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. धनखड यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पर्यावरण विषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधीत केलं. अशा प्रकारच्या सहकार्यामुळेच पर्यावरणीय शाश्वतता आणि आर्थिक विकास साध्य करता येईल असं ते म्हणाले. पर्यावरणीय समस्यांचं निराकरण एकटा व्यक्ती, गट किंवा कोणताही एक देश करू शकत नाही असं ते म्हणाले. नागरिकांना पर्यावरण संवर्धनावर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.