डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिका युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार

अमेरिका लवकरच युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.युक्रेनवर रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत आहेत. युक्रेनला हवाई संरक्षणाची अत्यंत गरज असून त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही क्षेपणास्त्र  दिली जात असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  सांगितलं. मात्र, किती क्षेपणास्त्र युक्रेनला देणार हे अद्याप ठरलं नसल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.  या क्षेपणास्त्रांचा खर्च युरोपियन युनियन करणार आहे. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा