अमेरिकेकडून नऊ जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या आयातशुल्क अंमलबजावणीला आता एक ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे जगभरातील अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी समाज माध्यमाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ देशांवरील नवीन आयातशुल्काची रूपरेषा जाहीर करण्यात आली असून, ते एक ऑगस्टपासून लागू होतील. दोन एप्रिल रोजी भारतासह अनेक देशांना आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता, परंतु नंतर त्यांची अंमलबजावणी ९० दिवसांसाठी थांबवण्यात आली, ज्यामुळे अनेक देशांना व्यापारी करार करण्यासाठी नऊ जुलैपर्यंत वेळ मिळाला. आता बाधित देशांना अमेरिकेसोबत अंतरिम व्यापार करारांना अंतिम रूप देण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
Site Admin | July 8, 2025 1:36 PM | Donald Trump | Tariff | US
अमेरिकेच्या आयातशुल्क अंमलबजावणीला मुदतवाढ
