अमेरिकेच्या आग्नेय भागात झालेल्या वादळामुळं किमान ३४ जणांचा मृत्यू झाला असून घरं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वादळाचा फटका अनेक राज्यांना बसला आहे. मिशिगन, मिसुरी, इलिनॉईस या राज्यांसह सात राज्यांत अडीच लाख घरांतील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या भागात वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता असून मध्य मिसिसिपी, ईशान्य लुईझियाना आणि टेनिसीचा पश्चिम भाग, तसंच अलाबामा आणि अर्कान्सास या भागात वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जॉर्जियाचें गव्हर्नर यांनी ब्रायन केम्प यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
Site Admin | March 16, 2025 8:05 PM | US Storm
अमेरिकेत झालेल्या वादळामुळे ३४ जणांचा मृत्यू
