रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीची केलेली घोषणा योग्य नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
रशियाने त्यांच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेव्हेस्टनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जगातल्या इतर कोणत्याही देशाकडे नसलेली ही यंत्रणा लष्करी सेवेत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तयार करण्याची तयारी करण्याचे आदेश त्यांनी रशियाच्या लष्कराला दिले.