अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. जागतिक हितासाठी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान, सुलीवन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची ही भेट घेतली.स्थानिक तसंच जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी बैठकीनंतर दिली.