डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत व्हिसावरील तात्पुरत्या सहा महिन्यांचा निलंबनाची आणि आवश्यकता वाटल्यास निलंबनाचा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे. या अधिसूचनेअंतर्गत ट्रम्प प्रशासानानं आपल्या परराष्ट्र विभागाला या अधिसूचनेतील निकषांच्या आधारे हार्वर्डच्या कोणत्याही विद्यमान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि एक्सचेंज व्हिसा रद्द होऊ शकणार असतील तर ते रद्द करण्याचा विचार करावा असे निर्देशही दिले आहेत.

 

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाची ही आणखी एक बेकायदेशीर तसंच प्रतिशोध घेणारी कृती असून, यामुळे हार्वर्डला पहिल्या घटनादुरुस्तीअंतर्गत असलेल्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याची प्रतिक्रिया  असल्याची प्रतिक्रिया हार्वर्ड विद्यापीठानं दिली आहे. विद्यापीठ यापुढेही आपल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत राहील असंही विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.