इराण-इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं जाहीररीत्या उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला असून, हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सर्व विमानं इराणी हवाई हद्दीबाहेर आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमध्यमावरील संदेशातून जाहीर केलं आहे. इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यानं अमेरिकेने नाईलाजास्तव ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर इराणने आता शांतता प्रस्थापित करावी असं आवाहनही ट्रंप यांनी केलं आहे.
Site Admin | June 22, 2025 1:25 PM | Donald Trump | Iran - Israel Conflict
इराणच्या ३ अणुप्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला
