डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 6, 2025 3:36 PM | QR Code | UPI

printer

UPI क्यूआर कोडने नोंदवली ९१.५० टक्क्यांची वाढ

यूपीआय क्यूआर कोडने २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ९१.५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यूपीआय क्यूआर कोडमध्ये वाढ झाल्यानं क्रेडिट कार्ड व्यवहारांचा विकासदर ७ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये २४ लाख ७७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात पाचपैकी चार व्यवहार यूपीआय वापरुन करण्यात आले आहेत.