सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी कणकवलीसह काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं, शहरासह अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि जांभूळ पिकांचं मात्र नुकसान झालं आहे.