केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा येत्या १० तारखेला नवी दिल्लीत सहकार कुंभ २०२५ या शहरी सहकारी पतक्षेत्रावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रीय शहरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या महासंघाच्या अध्यक्षा लक्ष्मी दास यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वप्नांचं डिजिलायझिंग – समुदायांचं सशक्तीकरण ही या दोन दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत डिजिटल नवोपक्रम, प्रशासन सुधारणा आणि सहकारी चळवळीतल्या महिला तसंच युवांचं सक्षमीकरण या विषयांवर चर्चा होईल.
Site Admin | November 6, 2025 8:27 PM | Home Minister Amit Shah
केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या १० तारखेला सहकार कुंभचं उद्घाटन करणार