डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिशाभूल बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध – राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी आज सांगितलं. अशा खोट्या बातम्यांमुळे लोकशाही कमकुवत होण्याची तसंच समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मुरुगन यांनी सांगितलं.  

 

दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांनाही केबल टेलिव्हिजन नेटवर्क विनियमन अधिनियम १९९५ अंतर्गंत काही नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. डिजीटल माध्यमांवरही सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गंत आयटी नियम २०२१ काही नियम घालून दिल्याची माहितीही मुरुगन यांनी उत्तरात दिली.