डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणात निजामाबाद इथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणात निजामाबाद इथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं उद्घाटन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निजामाबादला राष्ट्रीय हळद मंडळ मंजूर करून हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आणि जनतेचे ४० वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याचं शहा यावेळी म्हणाले. २०३०पर्यंत हळदीची एक अब्ज डॉलर्सची निर्यात साध्य होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माओवाद्यांनी शरणागती पत्करुन राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. मात्र शस्त्र हाती घेऊन आदिवासी आणि पोलीस जवानांचा हत्या करणारांशी चर्चा शक्य नाही, असं ते म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा