सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत एकता दौडचं आयोजन

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आज एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी ही एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या एकता दौडीला हिरवा झेंडा दाखवला. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही, तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले.  केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.