केंद्रीय कृषी मंत्री आज ब्राझीलमध्ये १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत होणार सहभागी

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओ पाउलो इथे १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि व्यापारामार्फत शाश्वत कृषी तंत्राला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होईल, असं कृषी मंत्रालयाने एका पत्रकात म्हटलं आहे. या दौऱ्यात कृषिमंत्री चौहान, ब्राझीलचे कृषीमंत्री कार्लोस फावेरो तसेच कृषिविकास आणि कुटुंबशेती मंत्री लुईझ टिकसेरा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ब्राझीलमधल्या कृषी संलग्न व्यापारात सहभागी कंपन्यांशीदेखील ते चर्चा करणार आहेत. तिथल्या भारतीय दूतावासात ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमाअंतर्गत ते वृक्षारोपण करणार असून साओ पाउलो इथल्या भारतीय समुदायाशीही ते संवाद साधणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.