July 8, 2025 1:20 PM

views 17

ब्रिक्स परिषद आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझिलियामध्ये दाखल

रिओ द जिनेरोमधील दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर, ब्राझील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ब्राझिलियामध्ये दाखल झाले. ब्राझीलच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. ब्राझिलचे अध्यक्ष लुइझ इनासियोलुला दा सिल्वा यांच्यासमवेत ते आज व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या भेटीत द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या होतील अशी माहिती ब्राझिलमधल्या भारतीय राजदूतांनी दिली. त्यानंतर आपल्या परदेश दौऱ्याच्या शेवटच्या...

July 6, 2025 12:48 PM

views 19

अर्जेंटिनाच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये पोहोचले, १७व्या ब्रीक्स परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथं पोहोचले. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिलाना भेट द्यायची ५७ वर्षांतली ही पहिली वेळ आहे. या भेटीची सुरुवात मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्यसैनिक जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्याशी बैठक घेतली आणि व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, आरोग्य आणि औषधनिर्मिती यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द...

April 17, 2025 1:51 PM

views 31

केंद्रीय कृषी मंत्री आज ब्राझीलमध्ये १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत होणार सहभागी

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओ पाउलो इथे १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि व्यापारामार्फत शाश्वत कृषी तंत्राला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होईल, असं कृषी मंत्रालयाने एका पत्रकात म्हटलं आहे. या दौऱ्यात कृषिमंत्री चौहान, ब्राझीलचे कृषीमंत्री कार्लोस फावेरो तसेच कृषिविकास आणि कुटुंबशेती मंत्री लुईझ टिकसेरा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ब्राझीलमधल्या कृषी संलग्न व्यापारात सहभा...

December 23, 2024 1:21 PM

views 22

ब्राझीलमध्ये पर्यटनस्थळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये काल ग्रामाडो शहरातल्या एका पर्यटनस्थळावर एक विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटसह सर्व १० जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिकजण जखमी झाले. ट्विन-इंजिन असलेलं पायपर पी.ए-४२ चेयेन हे विमान उड्डाणानंतर लगेचच एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोसळले आणि नंतर शेजारच्या फर्निचरच्या दुकानावर आदळलं, असं ब्राझीलच्या नागरी संरक्षण संस्थेनं म्हटलं आहे.

September 21, 2024 2:41 PM

views 30

भारत आणि ब्राझील यांनी ऊर्जा क्षेत्रातील विद्यमान सहयोग आणि द्विपक्षीय व्यापारातील परस्पर फायदेशीर संबंधांचा घेतला आढावा.

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य आणि व्यापारातले परस्पर संबंध तसंच, जैवइंधन क्षेत्रातल्या भागीदारीविषयी आज चर्चा झाली. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्री अलेक्झांड्रे सिल्वेरा यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात चर्चेविषयी माहिती देण्यात आली.

August 26, 2024 1:05 PM

views 21

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. वीईरा यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझील यांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना मिळेल, असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मौरो वीईरा उद्या होणाऱ्या नवव्या भारत-ब्राझील कमिशनच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संयुक्तपणे भुषवतील.  यावर्षीचं जी २० चं अध्यक्षस्थान ब्राझीलकडे आहे, या परिषदेतून चांगले परिणाम उपजावेत यासाठी दोन्ही देश चर्चा...