केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या संभाजीनगर दौऱ्यावर

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या संभाजीनगर जिल्हा आणि परिसरातल्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहे. कृषीमंत्र्यांचा हा एकदिवसीय दौरा असून ते यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील, पूरग्रस्त भागाचा तसंच कृषी आणि ग्रामीण विकास योजनांच्या अंलबजावणीचा आढावा घेतील, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. अरणपूर या गावासह घरकुल गृहनिर्माण प्रकल्पालाही ते भेट देणार आहेत. त्यासह पुरामुळे नुकसान झालेल्या विंधन विहिरी, पूल आणि रस्त्यांची ते पाहणी करणार असून पायाभूत सुविधांचा देखील आढावा घेणार आहेत.