उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. तसंच, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.
एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सेवेचा समावेश असेल. तसंच शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बस सुविधा सुरू करण्यात येईल, अशी आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.