September 2, 2024 1:29 PM | Manipur

printer

मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार

मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांनी इम्फाळ वेस्ट जिल्ह्यातल्या कौत्रुक या गावावर काल केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. मृतांमधे एका महिलेचा समावेश असून तिची आठ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

 

दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. निःशस्त्र गावकऱ्यांवर कुकी अतिरेक्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या सरकारचे प्रयत्न अयशस्वी करण्याचा प्रयत्न असल्याचं गृह विभागानं म्हटलं आहे.