September 19, 2025 1:39 PM

views 31

मणिपूरमध्ये ६ अतिरेक्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला

मणिपूरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत चुडाचांदपूर, तेंगनौपाल आणि चंदेल या जिल्ह्यांमध्ये मोठी शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला, तसंच ६ कट्टरपंथीयांना अटक केली. त्यांच्याकडून २ एसएलआर रायफली, १ इन्सास रायफल, १ संशोधित पॉइंट ३०३ रायफल, १ इन्सास एलएमजी मॅगझीन, ३ इन्सास रायफल मॅगझीन्स, ७.६२ एसएलआर रायफलचे चार मॅगझीन, १, ३०३ रायफल मॅगझीन, पॉइंट ३०३ रायफलची २७ काडतुसं, ७ पूर्णांक ६२ शतांश मिलिमीटर एसएलआरची २३ काडतुसं, १४ राउंड एके रायफलची काडतुसं, ३५ रा...

September 8, 2025 3:20 PM

views 43

मणिपूरमध्ये काल 6 दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी काल वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली. पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलाने शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जप्त केला. त्यात रायफल्स, रिव्हॉल्वर, स्फोटकं आणि इतर दारुगोळ्याचा समावेश आहे. तसंच, पूर्व इम्फाळ जिल्ह्यात खाबम लामखाई इथून ५० किलो गांजासह दोघांना अटक करण्यात आली.

August 3, 2025 2:07 PM

views 28

मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे. सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं, खंडणी, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.   त्याखेरीज या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखेरीज चुराचांदपूर आणि कांगपोकपी या जिल्ह्यांमधून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे...

June 11, 2025 3:22 PM

views 26

मणिपूर राज्यात जमावबंदी शिथिल

मणिपूर राज्यात खोऱ्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये  आज सकाळी ५ पासून संध्याकाळी ५ पर्यंत जमावबंदी शिथिल केली आहे. इंटरनेट वापरावरचे निर्बंध मात्र  कायम आहेत. इंफाळचा पूर्व आणि पश्चिम भाग, थोंबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या भागांमध्ये अशांततेनंतर  जमावबंदी लागू केली होती.   राज्यात उद्भवलेल्या हिंसाचाराला कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन एका नेत्याला केंद्रीय गुप्तचर विभागाने ताब्यात घेतल्यानंतर या पाच जिल्ह्यांमध्ये होऊ लागलेल्या विरोधाच्या पार्शवभूमीवर हा जमावबंदीचा आदेश  लागू केला होता

June 8, 2025 7:55 PM

views 36

मणिपूरमधल्या पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

मणिपूरमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मैतेई समुदायाच्या अरंबाई टेंगगोल या कट्टरतावादी संघटनेच्या सदस्यांना झालेल्या अटकेनंतर या भागात हिंसक निदर्शनं झाली होती. त्यामुळे इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये आधी पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता संचारबंदी आणि जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या पाचही जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दलांची पथकं तैनात करण्यात आली आहे...

June 6, 2025 3:12 PM

views 22

मणिपूरमध्ये ८ सशस्त्र अतिरेकी अटक

सुरक्षा यंत्रणांनी आज मणिपूरमधे ८ सशस्त्र अतिरेक्यांना अटक केली. प्रतिबंधित युनायटेड पीपल्स पार्टी ऑफ कांगलेईपाकचे ३ कार्यकर्ते तसंच प्रतिबंधित पीपल्स लिबेरेशन आर्मी चे ४ कार्यकर्ते इम्फाळ जिल्ह्यातून पकडले गेले. आणखी एकाला बिशनुपूर जिल्ह्यातून पकडण्यात आले.

May 23, 2025 10:19 AM

views 193

मणिपूरमध्ये विशेष एनआयएची स्थापना

मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये विशेष एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था न्यायालयाची स्थापना केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून, चुराचंदपूर जिल्ह्यातील सत्र न्यायालयाला विशेष एनआयए न्यायालय म्हणून नियुक्त केले आहे.

May 15, 2025 1:01 PM

views 36

मणिपूरमध्ये बंडखोर गटाचे १० सदस्य ठार

भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडनं मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात काल मध्यरात्री राबवलेल्या विशेष अभियानात बंडखोर गटाचे १० सदस्य ठार झाले. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लष्कराच्या विशेष पथकानं ही कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला. ठार झालेल्या बंडखोरांची ओळख पटली असून, ते  मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कार्यरत बंडखोर गटाशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे. ही कारवाई अजूनही सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

April 3, 2025 9:37 AM

views 39

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यतेबाबत लोकसभेत ठराव मंजूर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मणिपूरमध्ये स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. या राज्यात शांतता प्रस्थापित होण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले आणि गेल्या चार महिन्यांमध्ये संघर्षामुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचं सांगितलं.

March 31, 2025 7:13 PM

views 43

मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये-एन बीरेन सिंग

मणिपूरमधल्या संघर्षाला अमली पदार्थ, घुसखोरी, आणि जंगलतोड अशी विविध कारणं असल्याचं मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी म्हटलं आहे. समाजमाध्यमावर लिहीलेल्या पोस्टमधे त्यांनी म्हटलंय की मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये. मणिपूरने आतापर्यंत खूप भोगलंय आणि मणिपूरच्या बाहेरच्या व्यक्तींनी त्यासंदर्भात ढवळाढवळ करु नये. मे २०२३ पासून मणिपूरमधे झालेल्या संघर्षात अडीचशेहून जास्त जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर बीरेन सिंग य...