डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जनुकीय तंत्रज्ञानाने तांदळाचे वाण विकसित करणारा भारत ठरला पहिला देश

जनुकीय तंत्रज्ञानानेतांदळाचे वाण विकसित करणारा   पहिला देश हा मान भारताने पटकावला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या भारतीय जिनोम संवर्धित तांदळाच्या दोन वाणांचं लोकार्पण केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यानी काल नवी दिल्लीत केलं.  वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्याच्या दृष्टीनं हे संशोधन महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.

 

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड, बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिमबंगाल आणि मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी विशेषत्वाने हे वाण तयार करण्यात आले आहेत. देशाच्या दृष्टीनं हा दिवस ऐतिहासिक असून, या भारतीय वाणांमुळे धानाच्या पिकाचं उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्चात घट होईल असं चौहान म्हणाले तसच हे संशोधन करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.