कमला हॅरिस यांच्यासोबत आणखी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये सहभागी न होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासह राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रेसिडेंन्शियल डिबेट अर्थात वादविवादात सहभागी होणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. फिलाडेल्फियामध्ये झालेल्या सुरुवातीच्या वादविवादात विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि महत्त्वाच्या वृत्त वाहिन्यांवरचे आमंत्रण हॅरिस स्वीकारत नसल्याचा दावा केला. हॅरिस यांनी आणखी वादविवादांची मागणी केली. मतदारांप्रती ते कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. एका सर्वेक्षणानुसार ६३ टक्के लोकांनी या वादविवादात हॅरिस यांनी चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.