डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 19, 2025 3:15 PM | Donald Trump

printer

ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नलवर दाखल केला मानहानीचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि त्याच्या मालकांविरोधात  १० अब्ज डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. वृत्तपत्राच्या मालकांमध्ये रुपर्ट मर्डोक आणि डोव्ह जोन्स यांच्या सह इतर काही व्यक्तींचा समावेश आहे. 

 

वॉल स्ट्रीट जर्नलनं २००३ साली जेफ्री एपस्टाईन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत ट्रम्प यांचं नाव प्रकाशित केलं होतं. या बातमीमुळे आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असून आर्थिक नुकसान झाल्याचं ट्रम्प यांनी मियामी इथल्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. मॅक्सवेलना  २०२१ मध्ये पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं, तर एपस्टाईननी  २०१९ मध्ये न्यूयॉर्क इथल्या  तुरुंगात आत्महत्या केली होती. 

 

दरम्यान, ट्रम्प यांच्या  कायदेशीर कारवाईला आपण जोरदार प्रत्युत्तर देऊ, असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या मालकांनी म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा