डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 2, 2025 12:48 PM | Donald Trump | US

printer

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार असल्याचं अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, ट्रम्प यांच्या घोषणेनुसार अमेरिकन वस्तुंवर कर लावणाऱ्या देशांवर परस्पर कर लागू केले जातील.

 

तर वाहनांच्या आयातीवर २५ टक्के कर उद्यापासून लागू केला जाईल. यामुळे अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचा हेतू असून इतर देशांकडून चालणाऱ्या अन्याय्य व्यापारासाठी ही एक प्रकारे शिक्षा ठरणार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी या करांविषयी घोषणा करताना म्हटलं होतं.