डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात वाराणसी-खजुराहो, लखनौ-सहारानपूर, फिरोजपूर-दिल्ली, आणि एर्नाकुलम-बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता १६० झाली आहे.

 

विकसनशील देशांमधल्या पायाभूत सुविधांचा विकास हा त्या देशाच्या आर्थिक विकासात भर टाकत असतो. रेल्वे आणि रस्ते बनतात तेव्हा विकासाला चालना मिळते, आज भारत देखील विकासाच्या मार्गावर वेगानं जात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.

 

वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत, वंदे भारत ही भारतीयांकडून भारतीयांसाठी चालवली जाणारी गाडी असून प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

 

बाबा विश्वनाथ धाम आणि अयोध्येतल्या राम मंदिरामुळे उत्तरप्रदेशात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. वाराणसीमधे देखील पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने होत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. याठिकाणी आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असून वाराणसी या प्रदेशाची आरोग्य राजधानी बनली असल्याचे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. यावेळी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.