राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या ७ बैठकांमध्ये एकंदर ७२ तास ३५ मिनिटं काम झाल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तर विधानपरिषदेच्या ७ बैठकांमध्ये ४८ तास १६ मिनिटं कामकाज झालं, असं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. या कालावधीत विधानसभेत एकंदर १८ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली आणि त्यातली १६ मंजूर झाली, तर विधानपरिषदेत ४ विधेयकं संमत झाली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६पासून मुंबईत होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.