October 23, 2024 2:28 PM | Delhi | Hockey

printer

भारत आणि जर्मनी यांच्यातील हॉकी मालिकेला आज नवी दिल्लीत सुरुवात होणार

भारत आणि जर्मनी यांच्यात हॉकीच्या मालिकेला आजपासून दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल. हॉकी इंडियानं डिजिटल तिकीट प्रणालीद्वारे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश देण्याची घोषणा केली आहे.

 

डीडी स्पोर्ट्सवर सामन्याचं थेट प्रक्षेपण चाहत्यांना पाहता येणार आहे. एका दशकानंतर राजधानीत आंतरराष्ट्रीय हॉकीची मालिका रंगणार असून हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.