डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

राज्यात अतिवृष्टीमुळं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी, अशी मागणी विधानसभेतला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

 

अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर, सांगली या शहरांना पुराचा धोका होऊ नये, यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.