भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारतीय फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. भारताच्या हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना फारशी चमक न दाखवता माघारी परतल्या. त्यामुळे भारतीय संघ ३४ षटकांत सर्वबाद १०० धावा करू शकला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सलामीची फलंदाज फिबी लिचफिल्ड ३५ धावा काढून बाद झाली.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या षटकात बाद धावा झाल्या होत्या.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.