जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येत आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमधे प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जम्मूच्या पालोरा भागात सभा घेतली. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही जम्मू काश्मीरला भेट दिली. या आठवड्यात प्रधआनमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रचारसभा होणार असल्याचं आकाशवाणी वार्ताहराने कळवलं आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.