चौथ्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा स्पर्धेत दीपक आणि नमन तंवर यांनी काल दोन सुवर्ण पदकं पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दीपकने ७५ किलो वजनी गटात उजबेकिस्तानच्या खेळाडूूला ५-० ने हरवलं तर नमन याने चीनच्या खेळाडूला ९० किलो वजीन गटात ४-१ अशी मात दिली.
महिलांच्या ८० किलो वजनी गटात भारताच्या किरणला कझाकिस्तानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. तर भारताच्या तमन्ना, प्रिया, संजु, स्नेह आणि लालफाकमावी राल्ते यांनी कांस्य पदकं जिंकली.