June 2, 2025 12:39 PM

views 42

Thailand Open 2025: दीपक आणि नमन तंवर यांनी सुवर्ण पदक पटकावलं

चौथ्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा स्पर्धेत दीपक आणि नमन तंवर यांनी काल दोन सुवर्ण पदकं पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दीपकने ७५ किलो वजनी गटात उजबेकिस्तानच्या खेळाडूूला ५-० ने हरवलं तर नमन याने चीनच्या खेळाडूला ९० किलो वजीन गटात ४-१ अशी मात दिली.    महिलांच्या ८० किलो वजनी गटात  भारताच्या किरणला कझाकिस्तानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. तर भारताच्या तमन्ना, प्रिया, संजु, स्नेह आणि लालफाकमावी राल्ते यांनी कांस्य पदकं जिंकली.