भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या दौऱ्यात ५ कसोटी सामने होणार असून ते २०२५-२०२७ च्या आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे. शुभमन गिल कडे नेतृत्वाची धुरा आहे. २००७ पासून भारताने इंग्लंडबरोबर कसोटी सामना जिंकलेला नाही