नेदरलँड्स इथे सुरु असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोम्मराजू गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम सामना त्या दोघांमध्ये होईल.
उपांत्य फेरीत काल प्रज्ञानंद ने सर्बियाच्या अलेक्सी सरेना याचा पराभव केला , तर नेदरलँड्स च्या जॉर्डन व्हॅन फॉरिस्ट शी झालेला सामना गुकेशने बरोबरीत सोडवला होता.