डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज ६५ हजार स्पर्धकांसह उत्साहात झाली. एलीट स्पर्धेचा प्रारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून केला. यावेळी चॅम्पियन विथ डिसेबिलिटीज स्पर्धा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेची सुरुवातही राज्यपालांनी केली. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत भाग घेतला. एलीट स्पर्धेत पुरुष गटात एरिट्रियाचा बरहेन टेसफे आणि महिला गटात केन्याच्या जॉइस चेपकेमोई यांनी विजय मिळवला. भारतीय एलीट विभागात पुरुष गटात अनीश थापा यानं, तर महिलांच्या गटात निर्माबेन ठाकोर हिनं बाजी मारली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा