डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टाटा स्मृती केंद्राची ‘आशेचे किरण’ या उपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून काम करण्यासाठी स्वाक्षरी

मुंबईच्या टाटा स्मृती केंद्रानं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या ‘आशेचे किरण’ या उपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून काम करण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या.

 

यावेळी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफाएल मारियानो ग्रोस्सी, टाटा स्मृती केंद्राचे संचालक डॉ सुदीप गुप्ता, ऑस्ट्रियामधले भारतीय राजदूत शंभू कुमारन, आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

 

या करारामुळे जागतिक आरोग्यसेवा सहकार्यात भारताचं योगदान वाढेल आणि कर्करोगाचे अत्याधुनिक उपचार गरजू रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा