अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची घोषणा केली आहे. एका समाज माध्यमावरील संदेशात, ९० दिवसांची ही सवलत प्रत्युत्तर करावर आणि १० टक्के करांवर लागू होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आमच्या कर योजनेचा भाग म्हणून या कराला ९० दिवसांचा विराम देण्यात येत आहे, मात्र चीनसाठीचा कर तात्काळ १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनने जागतिक बाजारपेठेला दाखवलेल्या अनादरामुळे – अमेरिकेने चीनवर आकारलेला प्रत्युत्तर कर वाढवला आहे.
काल मध्यरात्रीपासून चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर ८४ टक्के कर लादून प्रत्युत्तर दिलं आहे. हा कर पूर्वी 34 टक्के होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर १०४ टक्के कर लादल्यानंतर बिजिंगने वॉशिंग्टनवर गुंडगिरीचा आरोप करत हे पाऊल उचललं मात्र ट्रम्प यांनी हा कर तात्काळ 125 टक्क्यांपर्यंत वाढवला.दरम्यान व्हाईट हाऊसने जागतिक व्यापार व्यवस्था आणि जागतिक औद्योगिक आणि पुरवठा साखळींच्या सुरक्षिततेला आणि स्थिरतेला गंभीर नुकसान पोहोचवलं आहे असा आरोप काल प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेत चीननं केला आहे.
युरोपियन युनियनने अमेरिकन आयात केलेल्या काही वस्तूंवर कर लादण्याच्या बाजूनं मतदान केलं आहे. युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी युरोपियन युनियनच्या स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर अमेरिकेने समान कर लादल्याचा बदला म्हणून विविध अमेरिकन उत्पादनांवर २५ टक्के कर लावायला मान्यता दिली आहे. नवीन कर २०.९ अब्ज युरो किमतीच्या वस्तूंवर परिणाम करतील.Tariffsनवीन कर १५ एप्रिलपासून लागू होतील असं आयोगानं म्हटलं आहे.