भारतीय हवामान विभागानं येत्या चार दिवसांसाठी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढचे दोन दिवस पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरीमधे माहे, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकाचा अंतर्गत भाग, केरळ, लक्षद्वीप, ओडिशा, तेलंगणा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
Site Admin | October 21, 2025 12:32 PM | Heavy rain | Tamilnadu
तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
