August 18, 2025 2:37 PM August 18, 2025 2:37 PM

views 10

कुस्तीपटू विशाल याची लढत आज कांस्यपदकासाठी होणार

बल्गेरिया इथं सुरू असलेल्या २० वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भारतीय कुस्तीपटू विशाल याची लढत आज कांस्यपदकासाठी होणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या कुस्तीपटूकडून विशाल पराभूत झाला होता.

May 31, 2025 1:53 PM May 31, 2025 1:53 PM

views 7

उलान बातर २०२५ कुस्ती स्पर्धेत भारताला ४ सुवर्णपदक

मंगोलिया इथे आयोजित ‘उलान बातर २०२५ कुस्ती स्पर्धेत’ भारतीय कुस्तीवीरांनी काल ४ सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकं पटकावली. पॅरिस २०२४ ऑलिम्पिक पदक विजेती अंतिम पंघालनं ५३ किलो वजनी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर १०-० अशा मोठ्या फरकानं विजय मिळवला. ५७ किलो वजनी गटात नेहा संगवाननं, बोलोरतुया खुरेलखू या ऑलिम्पिक पदक विजेतीवर ४-० अशी मात करत सुवर्णपदक पटकावलं. तर, मुस्काननं ५९ किलो आणि हर्षितानं ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. याव्यतिरिक्त, पुरुषांच्या ग्रीको-रोमन ६० किलो वजनी गटात सुरज यानं रौप्य तर म...

March 11, 2025 2:48 PM March 11, 2025 2:48 PM

views 1

क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं

क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं आहे आणि मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे जॉर्डनमधे अम्मान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड चाचणीसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.   मंत्रालयानं सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची निवड नि: पक्षपातीपणे, पारदर्शकपणे आणि क्रीडा संहिता, कुस्ती नियम आणि इतर अधिकृत निर्देशांचे पालन करून करण्याचं तसचं महासंघाला आपल्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत समतोल राखण्याच...

October 24, 2024 3:44 PM October 24, 2024 3:44 PM

views 16

२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजित मोरेनं पटकावलं कांस्यपदक

अल्बानियात तिराना इथं सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजित रामचंद्र मोरे या कुस्तीगीरानं कांस्यपदक पटकावलं. त्यानं पुरुषांच्या ५५ किलो ग्रीको रोमन गटात अॅडम उलबाशेव्हचा १४-१० असा पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलचं पदक आहे. इराणच्या अली अब्दुल्लाअहमदी वफानं सुवर्ण, रशाद मम्मादोव्हनं रौप्य तर जपानच्या कोहेल यामागिवानं मोरे याच्याबरोबर कांस्यपदक पटकावले. महिलांच्या ५९ किलो वजनी गटात भारताच्या अंजलीनं अंतिम फेरी गाठली. काल उपांत्य फेरीत तिनं इटलीच...

September 6, 2024 1:30 PM September 6, 2024 1:30 PM

views 2

२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालनं पटकावलं सुवर्णपदक

२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली. ७६ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाईल प्रकारात ज्योती बरवालने युक्रेनच्या मारिया ऑर्लेविचला एकही गुण मिळू न देता तिचा दणदणीत पराभव केला. ६८ किलो वजनी गटात सृष्टीने तर ५९ किलो वजनी गटात कोमलने कांस्यपदक पटकावलं. ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या निकीताची लढत  युक्रेनच्या इरिना बोंदारबरोबर होईल.