June 5, 2025 2:59 PM

views 30

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी केलं ‘वृक्षारोपण’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसर पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनानं आजपासून ३१ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं  आयोजित करण्यात आलं आहे.     या निमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच...

June 5, 2025 1:23 PM

views 12

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर ‘वृक्षारोपण’

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी वटवृक्षाचं रोप लावलं. ही मोहीम अरवली हरित भिंत प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पात सातशे किलोमीटरच्या अरवली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरण केलं जाणार आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी शेंदराची रोपं लावली. १९७१ च्या  युद्धात शौर्य गाजवणाऱ्या कच्छ आणि गुजरातमधल्या वीरांच्या माता आणि भगिनींनी ही रोप...

June 5, 2025 1:20 PM

views 24

आज जागतिक पर्यावरण दिन

देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेनं १९७३ मध्ये आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता. हा दिवस १४३ हून अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे साजरा केला जातो. ‘प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करा’ ही या वर्षीच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे.    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

June 5, 2025 9:35 AM

views 22

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात विशेष वृक्षारोपण मोहीम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत भगवान महावीर वनस्थळी उद्यानात होणाऱ्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणार आहेत. एक पेड मां के नाम या उपक्रमाचा भाग म्हणून ही मोहीम होत आहे. अरावली हरित भिंत प्रकल्पाचा ती भाग आहे. सातशे किलोमीटरच्या अरावली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरणाचा तो भाग आहे.