April 22, 2025 1:17 PM April 22, 2025 1:17 PM
23
जागतिक वसुंधरा दिवस आज सर्वत्र साजरा
पर्यावरण रक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा होत आहे. १९६९ साली युनेस्कोच्या शिखर परिषदेत झालेल्या ठरावानंतर १९७० मध्ये पहिला जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. ‘आपली शक्ती, आपला ग्रह’, ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे. पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर जागरूकता वाढवणं आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देणं, हे वसुंधरा दिनाचं उद्दिष्ट आहे. यंदाची संकल्पना शाश्वत ऊर्जेकडे वळण्याची तातडीची गरज अधोरेखित करते आणि व्यक्ती, समूह आणि सरकारांना २०३...