December 11, 2025 2:48 PM December 11, 2025 2:48 PM
8
उत्तर प्रदेश आणि हरियाणा मधलं प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक बँकेचा विशेष निधी मंजूर
उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधलं प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक बँकेने विशेष निधी मंजूर केला आहे. जागतिक बँकेचे हंगामी संचालक पॉल प्रोसी यांनी काल याची घोषणा केली. या निधीतून उत्तर प्रदेश सरकारला २९ कोटी डॉलर्स आणि हरयाणा सरकारला ३० कोटी डॉलर्स मिळणार आहेत. या निधीचा वापर प्रदूषण नियंत्रण, राज्यातल्या स्वच्छता मोहीमा, तसंच विजेवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांसाठी होणार आहे.