October 22, 2024 8:33 PM October 22, 2024 8:33 PM
9
‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल
बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं ‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ येत्या गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ओदिशा किनारपट्टीवरच्या भितरकणिका आणि धामरा दरम्यान हे वादळ धडक देईल, असा अंदाज हवामानाच्या अनेक मॉडेल्सनं वर्तवला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. वादळाच्य...