June 11, 2025 8:35 PM

views 38

कोकण, गोवा तसंच दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता

मान्सून साधारणपणे येत्या आठवड्यात सक्रिय होईल. कोकण, गोवा तसंच  दक्षिण भारतात  काही ठिकाणी १२ ते १६ या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवा़डा, छत्तीसगढ, अंदमान निकोबार, तमिळनाडू तसंच पुद्दूचेरी कराईकल आदी भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील तर देशाच्या  वायव्येकडील भागात तसंच पश्चिम हिमालयीन प्रदेशांमध्ये उष्णतेची लाट असेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

June 6, 2025 3:43 PM

views 26

देशात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

आसाम आणि मेघालयमध्ये तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडच्या इतर राज्यांमधे, तसंच केरळ, माहे कर्नाटकचा किनारी भाग आणि पश्चिम बंगाल मधला हिमालयीन प्रदेश इथं येत्या ७ दिवसात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, कर्नाटकाचा आतला भाग, मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमधे उद्यापर्यंत सोसाट्याचे वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमधे आज वातावरण उष्ण आणि दमट राहील.

June 5, 2025 7:37 PM

views 27

राज्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

 राज्यात येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात - पुणे , नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाड्यात - छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, तर विदर्भात - नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,...

May 27, 2025 2:54 PM

views 26

देशातल्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्तीसगड, केरळ, पश्चिम बंगाल, मराठवाडा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, अंदमान निकोबार बेटे, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यातही येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   तर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. आज हिमा...

May 24, 2025 3:59 PM

views 26

नैऋत्य मौसमी पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल

नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय  झाला आहे.    या पार्श्वभूमीवर केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.    राज्यात आज मराठवाड्यासह, विदर...

May 21, 2025 1:38 PM

views 19

देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता

कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यालगत तसंच घाट विभागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसाम, मेघालय, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंढीगढ, उत्तर प्रदेशात २६ मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  

May 20, 2025 10:24 AM

views 30

देशात मुसळधार पावसाचा इशारा

कर्नाटकमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. त्यासह तामिळनाडू, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.उद्यापासून मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के जेनामानी यांनी दिली आहे. देशातल्या उत्तर भागात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले.

May 19, 2025 8:14 PM

views 24

देशात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढच्या पाच दिवसांत जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये पुढचे पाच ते सहा दिवस विजांसह वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे.    राजस्थानमध्ये २२ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरसह आसपासच्या भागात उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून उत्तराखंडमध्ये २४ मेपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.    ...

May 15, 2025 3:14 PM

views 31

देशातल्या अनेक भागात पावसाची शक्यता

देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि ईशान्येकडच्या प्रदेशात पुढले २ ते ३ दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, तर महाराष्ट्रात कोकण, गोवा, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, आणि अंदमान-निकोबार द्वीप समूहांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.    येत्या दोन दिवसांत उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे. पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, पुडुचेरी, करैकल, आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात आज, तर बिहार आणि ओदिशामध्ये उद्या...

May 6, 2025 1:34 PM

views 18

देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता

गुजरात, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   पुढील २ ते ३ दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, विदर्भ, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसांत राजस्थानमध्ये धुळीचं वादळ येण्याची शक्यता विभ...