डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातल्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्तीसगड, केरळ, पश्चिम बंगाल, मराठवाडा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, अंदमान निकोबार बेटे, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यातही येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

तर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. आज हिमाचल प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर पश्चिम राजस्थानमधील काही ठिकाणी दिवसा उष्णतेच्या लाटा आणि धुळीची वादळं येऊ शकतात, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा