May 5, 2025 3:54 PM May 5, 2025 3:54 PM
45
वेव्हज परिषदेच्यानिमित्त धाराशीवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
मुंबईत नुकत्याच झालेल्या वेव्हज - २०२५ या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्तानं लोकसंस्कृती आणि लोककलेची सांगड घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम होत आहेत. धाराशिव इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि आकाशवाणीचे वार्ताहर देविदास पाठक या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात सहभागी झाले होते.