मुंबईत गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या वेव्हज परिषदेचा आज समारोप झाला. वेव्हज् बाजार मध्ये १ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. WAVESX च्या माध्यमातून १५- १६ स्टार्टअपची गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे आणि यातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य सरकारने या परिषदेत सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे करार केले. त्यामुळे परिषदेच्या आयोजनाबद्दल माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी समाधान व्यक्त केले.
अखेरच्या दिवशी हजारो लोकांनी वेव्हज मध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनांना भेट दिली आणि माध्यम तसंच मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेतल्या. याशिवाय वेव्हजमध्ये झालेल्या विविध स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचे सादरीकरण देखील आज झाले. वाह उस्ताद, सिंफनी ऑफ इंडिया, बॅटल ऑफ बँड्स आणि ईडीएम चॅलेंजच्या विजेत्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.