March 21, 2025 9:22 AM

views 43

विकसित भारतासाठी गावांचा विकास आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्याचं प्रतिपादन

विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून गावांचा विकास करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलियाली धाम इथं झालेल्या कार्यक्रमात ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.   ग्राम विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचं महत्त्व अधोरेखित करताना, 'सबका प्रयास' ही देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. समाजाचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षणाचं महत्व या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. आगामी पिढीने शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनून सुदृढ समाजासा...

February 25, 2025 1:19 PM

views 43

विकसित भारताकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रीत झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते.   कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगारनिर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. पूर्वेकडच्या देशांबर...

November 27, 2024 7:41 PM

views 33

विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणवर्गाला केलं आहे. विकसित भारत ही चारस्तरीय स्पर्धा आहे. यात १५ ते २९ वयोगटातल्या व्यक्तीला भाग घेता येईल. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या डिजिटल प्रश्नमंजुषेने या स्पर्धेला सुरुवात होईल.   विकसित भारत हे लक्ष्य साध्य करण्यात तरुणांचा लक्षणीय सहभाग असायला हवा. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सरकारपर्यत पोचवण्यासाठी त्यांना मिळणारी ही मोठी संधी आहे असं सांगत, या स्पर्धेत भाग घेण्याच...

November 18, 2024 1:29 PM

views 32

विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवून भारताची प्रगतीच्या मार्गावर वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नायजेरियामधून रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी अबुजा इथं संवाद साधला. विकसित भारताचं उद्दिष्ट समोर ठेवून भारतानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे असं  ते म्हणाले. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करुन ते म्हणाले की जगाच्या दृष्टीने ही भारत आशेचा नवा किरण बनला आहे.

November 14, 2024 7:34 PM

views 55

महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज खारघर इथं प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला. केंद्र सरकारन दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं, चार कोटी बेघर लोकांना घर दिलं, जलजीवन मिशनद्वारे बारा कोटी घरांना पाणी दिलं, बारा कोटी गरीबांच्या घरी शौचालय बनवलं असं मोदी यांनी सांगितलं.     महायुती सरका...

July 31, 2024 10:03 AM

views 46

देश वेगानं प्रगती करीत असून सरकारचं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते. देशात रोजगाराला चालना देणाऱ्या सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देऊन, सरकार नागरिकांना रहाणीमानातली सुलभता आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन...